दिल्लीतील आगीत 43 जणांचा मृत्यू, राष्ट्रपती, पंतप्रधानांसह नेत्यांनी व्यक्त केले दुःख

दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी घटनास्थळाला जात परिस्थितीचा आढावा घेतला.

नवी दिल्ली | रविवारी पहाटे दिल्लीतील अनाज मंडी परिसतारीतल कारखान्यास भीषण आग लागली. या आगीमध्ये 43 लोक ठार झाले आहेत. या घटनेने लोक हादरले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. तर दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी घटनास्थळाला जात परिस्थितीचा आढावा घेतला.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विट करत शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, 'दिल्लीच्या अनाज परिसरात लागलेल्या आगीची दुखद बातमी ऐकून मला अत्यंत वाईट वाटले. दुर्घटनाग्रस्तांच्या कुटुंबांसाठी मी प्रार्थना करतो. जखमींची प्रकृती लवकरच सुधारावी अशी माझी इच्छा आहे. लोकांचे संरक्षण करण्यासाठी स्थानिक प्राधिकरण चांगले काम करत आहे.' असे ते ट्विट करत म्हणाले.

यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. AM News Developed by Kalavati Technologies