US Election Result 2020: 78 वर्षीय 'जो बायडन' यांनी रचला नवा इतिहास, असा राहिला त्यांच्या जीवनाचा प्रवास वाचा...

अमेरिकेत पार पडलेल्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत जो बायडन विजयी झाले असून, त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभव केला आहे

नवी दिल्ली । (सलमान शेख) 78 वर्षाचे जो बायडन जगातील सर्वात शक्तीशाली देशातील सर्वात शक्तीशाली खुर्चीवर विराजमान होणार आहे. जो बायडन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होणार आहे. बायडन यांनी ताकतवर म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांचा कडाडून पराभव केला. कोरोना काळातही अमेरिकेतील जनतेने मोठ्या प्रमाणात मतदान केल्याने जगभरात त्यांचे कौतुक होत आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडन यांच्यात निवडणूकीदरम्यान मोठ्या प्रमाणात संघर्ष पाहायला मिळाला.

नेमकं व्हाइट हाऊसवर कोण विराजमान होणार? हे अख्या जगाला कळेनासे झाले होते. अमेरिकेत पार पडलेल्या राष्ट्रपती निवडणूकीत विजयी झालेले जो बायडन हे बराक ओबामा आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात उप-राष्ट्रपती होते. 77 वर्षीय जो बायडन यांनी राष्ट्रपती पदासाठी 1988 आणि 2008 अशा दोन वेळी निवडणूक लढवल्या असून, गेल्या 50 वर्षांपासून ते राजकारणात सक्रिय आहेत.

बायडन यांच्या करिअरची सुरुवात

जो बायडन यांनी आपल्या आयुष्याची सुरुवात वकिलीच्या पेशाने सुरू केली. त्यानंतर काळांतराने त्यांनी राजकारणात प्रवेश केला. 1972 मध्ये त्यांनी डेलावेयरच्या न्यु काऊंटी येथुन निवडणूक लढवली व ते विजयी सुद्धा झाले. त्यानंतर 1973 ते 2009 पर्यंत बायडन सीनेटर म्हणून लगातार निवडून आले. मात्र 2009 मध्ये त्यांना ओबामा यांच्या कार्यकाळात उप-राष्ट्रपती म्हणून पद मिळाल्याने बायडन यांना सीनेटर पद सोडावे लागले.

अमेरिकेच्या राजकारणात दिग्गज नेत्यांपैकी एक बायडन यांची ओळख आहे. मात्र त्यांचं नाव अजूनही बऱ्याचशा लोकांना माहिती नसून, त्यांचे संपुर्ण नाव 'जोसेफ रॉबिनेट बायडन' असे आहे. त्यांचा जन्म अमेरिकेतील पेंसिलवेनिया राज्यातील स्कॅटन येथे झाला.  जो बायडन हे 1972 पासून आतापर्यंत सहा वेळा सीनेटर म्हणून निवडून आले आहे. बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्रपती असतांना बायडन यांनी अमेरिकेचे 47 वे उप-राष्ट्रपती पद सांभाळले. अमेरिकेच्या इतिहासात बायडन हे 5 वे युवा सीनेटर होते. बायडन जर अमेरिकेचे राष्ट्रपती झाले, तर ते अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात वृद्ध राष्ट्रपती म्हणून ओळखले जाणार आहे. कारण त्यांचे वय 78 वर्ष इतके आहे.

डेलावेयरातून सहा वेळा सीनेटर राहिलेले बायडन राष्ट्राध्यक्ष निवडणूसाठी तिसऱ्यांदा रिंगणात उतरले होते. 1988 साली त्यांनी पहिली राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढवली होती. मात्र त्यांच्यावर साहित्यिक चोरीचा आरोप लावण्यात आला होता. त्यामुळे त्यांना मागे हटावे लागले. त्यानंतर बायडन यांनी पुन्हा 2008 साली राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढवली होती. बायडन हे अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांच्या जवळचे असल्याने, ओबामा यांच्या कार्यकाळात बायडन 2008 ते 2016 पर्यंत उप-राष्ट्रपती होते. यंदाच्या 2020 च्या राष्ट्राध्यक्ष निवडणूकीत बायडन यांनी विजयी करण्यामागे बराक ओबामा यांचे खुप मोठे योगदान आहे.


जो बायडन यांच्या कुटुंबियांविषयी

जो बायडन याचा कौटुंबिक प्रवास खुपच त्रासदायक राहिला आहे. 1972 मध्ये कारच्या अपघातात बायडन यांची पहिली पत्नी आणि मुलगी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर पाच वर्षांनी बायडन यांनी जिल नावाच्या तरूणीशी दुसरे लग्न केले. त्यानंतर त्यांना 1981 मध्ये मुलगी व त्यानंतर मुलगा झाला. मात्र कालंतराने पुन्हा 2015 मध्ये त्यांच्या मुलाचा ब्रेन कॅसरमुळे मृत्यू झाला. या घटनेमुळे बायडन पुर्णपणे हादरले होते. त्याचा प्रभाव त्यांच्या जीवनावर पडला होता. त्यामुळे बायडन यांनी यंदाच्या राष्ट्रपती निवडणूकीत आरोग्य योजनेवर विशेष लक्ष केंद्रित केले. त्याच मुद्द्याला त्यांनी निवडणुकीचा एजेंडा बनवला. त्यामुळेच बायडन विजयी झाले असे म्हणता येईल.

Published by: Salman ShaikhAM News Developed by Kalavati Technologies