गुरुवारपासून 5 वी ते 12 वी पर्यंत शाळा सुरू होणार, 'या' राज्याने घेतला निर्णय

देशात कोरोनाचा वेग मंदावल्याने आता टप्याटप्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकार घेतांना पाहायला मिळत आहे

नवी दिल्ली । देशात गेल्या वर्षी कोरोनाने शिरकाव केला आणि त्यानंतर लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. त्यामुळे देशातील सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय केंद्र आणि राज्य सरकारने घेतला होता. मात्र आता देशात कोरोनाचा वेग मंदावल्याने, राज्य सरकार आता टप्याटप्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेत आहे. अशातच आता पंजाब सरकारने देखील शाळा सुरू करण्याबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. गुरुवारपासून राज्यातील शाळा सुरू होणार आहे.

पंजाब सरकारच्या आदेशानुसार, राज्यात 5 ते 12 वी पर्यंत सरकारी आणि खासगी शाळा सुरू होणार आहे. पंजाबचे शिक्षणमंत्री विजय इंदर सिंगने प्रतिक्रिया दिली आहे की, विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळा सुरू करण्याची मागणी केली होती. त्यामुळे शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 7 जानेवारीपासून सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत शाळा सुरू राहणार आहे. याची घोषणा कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी केली आहे.AM News Developed by Kalavati Technologies