खा.उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमधून शोभेची 'चांदीची' बंदूक चोरणाऱ्यास पोलिसांनी केले अटक

छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेस येथून आज एका कामगाराने शोभेच्या चांदीच्या बंदूकीची चोरी केल्याने, संशयित आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.

सातारा । साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेस येथून आज एका कामगाराने शोभेच्या चांदीच्या बंदूकीची चोरी केल्याने, संशयित आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. साताऱ्यातील सोने-चांदीच्या व्यापाऱ्यांकडे विक्रीसाठी जात असताना सातारा शहर शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल संजू गुसिंगे यांनी मोठ्या शिताफीने त्यास ताब्यात घेतले.

बंदूक विक्री करण्यासाठी आलेल्या संशयित चोरट्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे साधारण दोन फूट लांब, दिड किलो वजनाची 1 लाख 4 हजार रुपये किंमतीची चांदीची बंदूक आढळून आली. संशयित इसमाकडे अधिक चौकशी केली असता त्याने ही बंदूक खा.उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेस येथून चोरल्याची कबूली पोलिसांना दिली. या संशयित आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्यावर शाहुपूरी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.AM News Developed by Kalavati Technologies