राजस्थानातील मयंक प्रताप सिंह ठराला देशातील सर्वात कमी वयाचा न्यायाधीश

पहिल्याच प्रयत्नात परिक्षेत प्रथम आला, आता न्यायदानाच काम करणार

राजस्थान । राजस्थानातील मंयक प्रताप सिंह हा देशातील सर्वात कमी वयाचा न्यायाधीस म्हणून काम करणार आहे. मयंकने ही कामगीरी अवघ्या 21 व्या वर्षीच पूर्ण केली आहे. मयंक हा राजस्थामधील न्यायिक सेवा परिक्षा 2018 च्या परिक्षेत प्रथम आला आहे.

मयंकचा हा पहिलाच प्रयत्न होता ज्यात त्यांने हे यश संपानद केले आहे. न्यायधीशांना मिळणारे मान सन्मान पाहून मी या क्षेत्राकडे आलो असल्याचेही मयंक म्हणतो. राज्यस्थान मध्ये 2018 मध्ये न्यायिक परिक्षेसाठी वयाची अट ही 23 होती, ती आता 2019 मध्ये 21 करण्यात आली आहे.

या परिक्षेची तयारी करण्यासाठी आपण 12-12 तास अभ्यास करायचो, तसेच याची तयारी मी प्रथम वर्षापासुनच करत होतो. न्यायालयातील पेंडिंग असणाऱ्या कामा मुळे तसेच न्यायाधीशांना मिळणार मानसन्मान पाहून मी प्रेरित झालो असल्याचेही मयक सांगतो. लोकांना निपक्षपाती न्याय देण्याचा मी पूर्ण पर्यंत्न करणार असल्याचेही तो म्हणतो.AM News Developed by Kalavati Technologies