Chandrayaan 2 : प्रज्ञान रोव्हरचा असा असेल चंद्रावर संचार, ही आहे खासियत

चांद्रयान मोहिमेतील प्रज्ञान रोव्हरची A टू Z माहिती

बंगळुरू । आज केवळ देशच नाही तर संपूर्ण जग चांद्रयानावर नजर खिळवून आहे. 6 सप्टेंबर म्हणजे आज भारत चंद्रावर एक नवीन इतिहास रचणार आहे. आज रोव्हर प्रज्ञान हे लँडर विक्रमपासून होणार आहे. प्रज्ञान रोव्हर चंद्रावर पोहोचताच चंद्राच्या रहस्यांवरून पडदा उठायला सुरुवात होईल. इस्त्रोने प्रज्ञान रोव्हरची चंद्रावर उतरण्याची संपूर्ण शैली आणि व्हिडिओमध्ये त्याचे कार्य अशा प्रकारे दर्शविले आहे की, कोणाचीही छाती अभिमानाने भरून जाईल. चला जाणून घेऊया, प्रज्ञान रोव्हर चंद्रावर कसा संचार करेल आणि आपल्याला माहिती पाठविल.

सहा चाकी प्रज्ञान अनेक वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. याच्या सहा चाकांवर सोन्याच्या रंगाची ट्रॉलीसारखी बॉडी आहे. या बॉडीच्या सर्वात वर एक सौर पॅनल आहे, जे सूर्यापासून ऊर्जा घेऊन रोव्हर चालवणार आहे. याच्या दोन्ही भागांमध्ये एक-एक कॅमेरा आहे. हे दोन्हीही नेव्हिगेशन कॅमेरे आहेत जे रोव्हरला मार्गदर्शन करतील.

सौर पॅनेलसह दोन रिसीव्ह आणि ट्रान्समिट अँटेना आहेत. हे दोन्ही चंद्राच्या पृष्ठभागावर मिळालेली सर्व माहिती संदेशांद्वारे पाठवतील. हे ट्रान्समिट अँटेना रोव्हरचा सर्वात महत्त्वाचा भाग आहेत. याचप्रमाणे वाहनाच्या पुढील भागात जशी हेडलाइट दिसते, ठीक तशीच रोव्हरमध्ये एपीएक्सएस आहे. हे अल्फा कण एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर आहे, जे येथील कणांची संपूर्ण माहिती पृथ्वीवर पाठवेल आणि रोव्हरला संरक्षणही प्रदान करेल. इस्रोच्या माहितीनुसार, प्रज्ञानचे वजन 27 किलो आहे, ते 50W पॉवरने चालते. यात दोन पेलोड आहेत. त्याचे डायमेन्शन्स 0.9x0.75x0.85 आहेत. त्याचे मिशन लाइफ एक चंद्र दिवस आहे. चंद्राचा एक दिवस म्हणजे पृथ्वीवरील 14 दिवस.

रोव्हरच्या दोन चाकांच्या मध्यभागी रॉकर बोगी असेंब्ली आहे, ही चाके पृष्ठभागानुसार वळू शकतात आणि पुढे नेऊ शकतात. ही असेंब्ली मधले चाक वगळून पुढच्या आणि मागच्या चाकांना जोडते. इस्रोने व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार, विक्रम लँडरच्या मध्यभागातून प्रज्ञान रोव्हर ठीक तसाच उतरेल जसे विमानातून प्रवासी उतरतात. प्रज्ञान खाली उतरताच त्याचे सौर पॅनेल उघडतील आणि ते पूर्णपणे चार्ज होतील. येथून हे रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर फिरायला लागून मोहिमेशी संबंधित सर्व संदेश पृथ्वीवर पाठवण्यास सुरुवात करेल.

चंद्रावर पहिले पाऊल टाकताच तो प्रज्ञान रोव्हर चांद्रभूमीवर भारताची छाप सोडेल. इस्रोच्या माहितीनुसार, प्रज्ञान रोव्हर विक्रम लाँडरच्या पुढे केवळ 500 मीटर अंतरावर फिरेल. चंद्रावर उतरताच प्रज्ञान रोव्हर प्रति सेकंदाला एक सेंटीमीटर या वेगाने 500 मीटर अंतर कापणार आहे. यानंतर त्याला सौर ऊर्जेची आवश्यकता असेल. रोव्हरची सर्वात कठीण परीक्षा येथे असेल. चंद्रावरील एका दिवसाचा प्रवास हा पृथ्वीवर 14 दिवसांएवढा आहे. यादरम्यान प्रज्ञान रोव्हरला सौर ऊर्जा मिळत राहिली तर तो सर्वात कठीण परीक्षा देखील पार करेल. प्रज्ञान रोव्हर सौर ऊर्जेद्वारे चार्ज होऊन पृथ्वीवर सिग्नल पाठवत राहील.AM News Developed by Kalavati Technologies