पतंग उडविने पडले महागात; तोल जाऊन 17 वर्षीय युवकाचा मृत्यू..

परभणीतील अमेयनगर येथील घटना, पतंग उडवितांना तोल गेल्याने एकुलत्या एक मुलाचा मृत्यू

परभणी । पतंग उडवताना तोल जाऊन दुसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने एका 17 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास अमेयनगर परिसरात घडली घडली. येथील बाल विद्यामंदिर प्रशाळेतील चित्रकलेचे शिक्षक केशवराव लगड यांचा एकुलता एक मुलगा अभिजीत हा अमेयनगर येथील घराच्या दुसऱ्या मजल्यावरील गच्चीवर मित्रांसमवेत पतंग उडवित होता. मित्र निघून गेल्यानंतरही तो पतंग उडवित होता.

यादरम्यान त्याचा तोल गेल्याने तो दुसऱ्या मजल्याच्या गच्चीवरून खाली पडला गंभीर जखमी अवस्थेत त्यास खाजगी रुग्णालयात नेण्यात आले व तेथून शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 17 वर्षी अभिजित हा राष्ट्रीय स्तरावरील चित्रकलेमध्ये हुशार विद्यार्थी होता. त्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गौरव देखील केला होता. याच बरोबर त्याने अनेक पुरस्कार देखील मिळविले आहेत. अभिजीत यांच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी असा परिवार आहे. एकुलत्या एक मुलाची दोर दुर्दैवाने तुटल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.AM News Developed by Kalavati Technologies