#JOB । इस्रोमध्ये निघाली अनेक पदांची भरती, असा करा अर्ज

ISROमध्ये भरती; 10वी, 12वी उत्तीर्ण अन् आयटीआय पासही करू शकतात अर्ज

बंगळुरू । भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने तंत्रज्ञ व इतरपदांसाठी भरतीसाठी जाहीर केली आहे. जर तुम्हालाही देशाच्या या नामांकित संस्थेत या पदांवर नोकरी करायची इच्छा असेल तर तुम्ही isro.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण करू शकता. अर्ज करण्याची प्रक्रिया 24 ऑगस्टपासून सुरू झाली होती. 13 सप्टेंबर 2019 अर्जाची अंतिम मुदत आहे. याद्वारे एकूण 86 पदांची भरती करण्यात येणार आहे.

पदाचे वर्णन
इस्रोने तंत्रज्ञ-बी, ड्राफ्टमन-बी, आणि टेक्निकल असिस्टंट या पदांसाठी अर्ज मागवले आहेत.

  • फिटर - 20 पोस्ट
  • इलेक्ट्रिशियन मेकॅनिक - 15 पोस्ट
  • प्लंबर - 2 पोस्ट
  • वेल्डर - 01 पोस्ट
  • मॅकॅनिस्ट - 01 पोस्ट
  • ड्रॉफ्टमन बी - 12 पोस्ट
  • टेक्निकल असिस्टंट - 35

पात्रता

  • तंत्रज्ञ / ड्राफ्ट्समनसाठी मान्यताप्राप्त शाळेतून 10 वी / 12 वीची परीक्षा उत्तीर्ण असावी. यासह संबंधित विषयात आयटीआय/एमटीसी/एमएसी प्रमाणपत्र प्राप्त केलेले असावे.
  • टेक्निकल असिस्टंटसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेची सिव्हिल / मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी पदविका.

वयोमर्यादा
13 सप्टेंबर 2019 पर्यंत उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 35 वर्षे असावे.

महत्त्वाच्या तारखा
अर्ज करण्यास सुरुवात - 24 ऑगस्ट 2019
अर्ज करण्याची अंतिम तारीख - 13 सप्टेंबर 2019
फी भरण्याची शेवटची तारीख - 13 सप्टेंबर 2019

अशी आहे निवड प्रक्रिया
लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणीद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांची बंगळुरूमध्ये नेमणूक केली जाईल.

वेतन
टेक्निशियन बी / ड्राफ्टमन - 21,700 रुपये
तंत्रज्ञ सहायक - 44,900 रुपये

इस्रोमधील भरती अधिसूचना पाहण्यासाठी येथे क्लिक कराAM News Developed by Kalavati Technologies