देशात गेल्या 24 तासात 15,590 जणांना कोरोनाची लागण, तर 191 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

देशात कोरोनाचा वेग मंदावला असून, शनिवारपासून देशात कोरोना लसीकरणास सुरुवात होणार आहे

नवी दिल्ली । देशात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणास सुरुवात होणार असुन, देशात कोरोनाचा वेग मोठ्या प्रमाणात मंदावला आहे. गेल्या 24 तासात 15 हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासात 15 हजार 590 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून, 191 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 1 कोटी 5 लाख 27 हजार 683 एवढा झाला आहे.

सध्या देशातील विविध भागात 2 लाख 13 हजार 27 जणांवर उपचार सुरु असून, उपचारादरम्यान आतापर्यंत सुमारे 1 लाख 51 हजार 918 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 1 कोटी 01 लाख 62 हजार 738 जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. दरम्यान, देशात शनिवारपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना लसीकरणाचं उद्घाटन करणार असून, देशीतल सर्वच राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात कोरोना लसीकरण पार पाडले जाणार आहे.AM News Developed by Kalavati Technologies