कोरोना संकटात 'शिक्षक आपल्या दारी'चा अभिनव उपक्रम; ऑनलाईन-ऑफलाईन पध्दतीने शिक्षण सुरु

सोशल मीडिया, झूम मीटिंग मधून ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे

लातूर । यावर्षीचे शैक्षणिक वर्ष सुरू होऊनही कोरोना प्रादुर्भावामुळे शाळा व कोणत्याही शिक्षण संस्था सुरू झाल्या नाहीत. दरम्यान शिरूर अनंतपाळ तालुक्यातील कानेगावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने शिक्षण सुरु झाले आहे. शाळेतील राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षक सुशीलकुमार पांचाळ यांच्या पुढाकाराने 'शिक्षक आपल्या दारी' या उपक्रमांतर्गत पालकांच्या घरांच्या ओट्यावर व अंगणातच शाळा भरवली जात आहे.

तसेच सोशल मीडिया, झूम मीटिंग मधून देखील ऑनलाईन शिक्षण दिले जाते. आता मुले लातूर जिल्हा परिषदेचे नूतन मुख्यकार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतील कोरोना कॅप्टन म्हणून आपल्या घरच्या व शेजारच्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन शिकवत आहेत.AM News Developed by Kalavati Technologies