मुंबई | आयसीएसई आणि आयएससी बोर्डाचा दहावी बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यावर्षी दहावीमध्ये 98.54 आणि बारावीमध्ये 96.52 विद्यार्थी पास झाले आहेत. मुंबईच्या जूही रुपेश कजारिया आणि मुक्तसर मनहर बंसल हिने 99.60 टक्के मिळवून पहिला क्रमांक मिळावला आहे. तर बारावीमध्ये कोलकाताच्या देवांग कुमार अग्रवाल आणि बेंगलुरुच्या विभा स्वामीनाथनने 100 टक्के मिळवून टॉप केले आहे.
आयसीएसईची परीक्षा 22 फेब्रुवारीपासून 25 मार्च 2019 या काळात घेण्यात आल्या होत्या. तर आयएससीच्या 12 वीच्या परीक्षा 4 फेब्रुवारीते 25 मार्च 2019 या काळात आयोजित करण्यात आल्या होत्या. आयसीएसई आणि आयएससीमध्ये या वर्षी अडीच लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. गेल्यावर्षी हे दोन्ही निकाल 14 मे रोजी जाहीर झाले होता. गेल्यावर्षी हा निकाल 98.51 टक्के होता तर आयएससीचा निकाल 96.21 टक्के होता.
या वेबसाइटवर बघू शकता निकाल
cisce.org
results.cisce.org