अंतिम वर्षातील अंतिम सत्राच्याच विद्यार्थ्यांची परीक्षा होणार, उर्वरित वर्गाच्या परीक्षा रद्द - मंत्री उदय सामंत

अन्य वर्गाच्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना आतापर्यंतच्या सरासरी गुणांचा विचार करून पुढील वर्गात प्रवेश

मुंबई । कोरोनाचा महाराष्ट्रात हाहाकार सुरू असल्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचेही भवितव्य टांगणीला लागले आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांची पदवी अथवा डिप्लोमाच्या अंतिम वर्षातील अंतिम सत्राचीच परीक्षा होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. अन्य वर्गाच्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना आतापर्यंतच्या सरासरी गुणांचा विचार करून पुढील वर्गात प्रवेश देण्यात येणार असल्याचेही सांगितले. 

बीएची तीन वर्षांचा अभ्यासक्रम असून तेथील सहापैकी फक्त सहाव्या सेमीस्टरची परीक्षा घेणार. बीकॉमचंही तसंच होईल. आता जिथे 8 सेमिस्टर किंवा शैक्षणिक सत्र आहेत, तिथे आठव्या सत्राचीच परीक्षा होणार आहे. ज्या अभ्यासक्रमात १० सत्रे असतील तिथे १० व्या सत्राचीच परीक्षा होईल. याशिवाय एमए, एमकॉम आणि इतर दोन वर्षांच्या अभ्यासक्रमात एकूण चार सत्र आहेत, तिथे चौथ्या सत्राचीच परीक्षा होणार आहे. तर डिप्लोमाचा कालावधी तीन वर्षांचा कालावधी आणि सहा सत्रांचा आहे, अशा ठिकाणी सहाव्याच सत्राची परीक्षा होईल, असंही मंत्री उदय सामंत म्हणाले.

पाहा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषदAM News Developed by Kalavati Technologies