नातवाने दिली आजोबांना रांगोळी चित्रातून अनोखी आदरांजली

ग्रामीण भागात अजनही हात कला कायम जीवंत असल्याचे हे उदाहरण


अकोला । जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील अकोलखेड येथील फुले शाहू आंबेडकर शिक्षण प्रसारक व क्रीडा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने अंबादास नगराळे यांच्या दहाव्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने गौरव नगराळे या युवा चित्रकाराने आजोबांचे हुबेहूब चित्र रांगोळीतून साकारून त्यांना आगळीवेगळी आदरांजली दिली आहे. त्याचे हे सुंदर चित्र बघून ग्रामीण भागातून उदयाला येत असलेल्या समृद्ध चित्रकलेची जाणीव होते.

अकोलखेड येथील नेहरू विद्यालयात चतुर्थश्रेणी कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या सुधाकर नगराळे यांच्या कुटुंबात चित्रकलेचा कुठलाही पिढीजात वारसा नसताना गौरवला लहानपणापासूनच चित्रकला, वॉल पेंटिंग, रांगोळी काढणे या कलेची आवड निर्माण झाली. गौरव नगराळे या 21 वर्षीय तरूणांने आजवर साकारलेल्या सुंदर पेंटिंग, रांगोळ्या व हुबेहूब चित्र बघून ग्रामीण भागातून एक सक्षम चित्रकार देशात निर्माण होईल अशी आशा आहे.


गौरवचे दहावीपर्यंतचे शिक्षण अकोलखेड येथे हे तर बारावीपर्यंतचे शिक्षण हे अकाउंटमध्ये झाले. त्यामुळे चित्रकलेसाठी किंवा रांगोळी करण्यासाठी फारसे मार्गदर्शन किंवा शिकवणी त्याला कधीच मिळालीच नाही. गौरवने अकोल्यातील बाबासाहेब ढोणे चित्रकला महाविद्यालयातून कला शिक्षणाचा डिप्लोमा केला असून, वयाच्या एकविसाव्या वर्षी तो साकारत असलेले हुबेहूब चित्र सर्वांना थक्क करणारे आहेत. क्षणार्धात या चित्रकलेच्या कोणीही प्रेमात पडावे अशी सुंदर कलाकृती गौरव नगराळे यांच्या रूपाने ग्रामीण भागातून जन्माला आलेली आहे अकोला जिल्ह्यातील अकोलखेड सारख्या गावातून जन्माला आलेली ही कला पाहून खरोखरच ग्रामीण भागात अशा कितीतरी कला दडल्या आहेत असेच वाटते.AM News Developed by Kalavati Technologies