Corona Vaccination: लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार कोरोनाची लस

देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असून, दुसऱ्या टप्पात मोदी कोरोना लस घेणार आहे.

नवी दिल्ली । देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असून, एकाही राजकीय नेत्यांने कोरोनाची लस घेतलेली नाही. त्यामुळे राजकीय नेतेमंडळी कोरोनाची लस कधी घेणार? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी काही दिवसांपुर्वी असे वक्तव्य केले होते की, 'कोरोना लस आली तर पहिली कोरोना लस मी स्वत: ला तोटून घेईल.' मात्र त्यांनी ऐणवेळी युटर्न मारला असून, देशात 16 जानेवारीपासून सुरु झालेल्या कोरोना लसीकरणाच्या दिवशी त्यांनी कोरोना लस घेतली नाही.

कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री, खासदार कोरोनाची लस घेणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. सद्या कोरोना लसीकरणाचं पहिला टप्पा सुरु असून, हा टप्पा एप्रिलपर्यंत सुरु राहणार आहे. कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ज्यांचे वय 50 च्या पुढे आहे अशा 75 टक्के खासदार, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. पीआरएस विधायी अनुसंधान नुसार, लोकसभातील 343 आणि राज्यसभेतील 200 खासदारांचं वय 50 वर्षांपेक्षा अधिकचं आहे. मोदी सरकारमधले 95 टक्के कॅबिनेट मंत्र्यांना ही लस दिली जाणार आहे.

दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर लोकसभा ते विधानसभेपर्यंत ही मोहीम सुरु केली जाणार आहे. लसीकरणासंदर्भात आरोग्य मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात कोणत्याही लोकप्रतिनिधींना लस दिली जाणार नाही. एप्रिलनंतर सुरु होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातच लोकप्रतिनिधींना कोरोनाची लस देण्यात येणार आहे.

या व्यक्तींनी मिळू शकते सर्वात अगोदर लस

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, देशातील अधिक लोकप्रतिनिधींचे वय 80 वर्षांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे त्यांना दुसऱ्या टप्प्यात सर्वात अगोदर कोरोना लस दिली जाऊ शकते. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि एचडी देवगौडा तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येद्दियुरपा यांना कोरोनाची लस सर्वात अगोदर दिली जाण्याची शक्यता आहे.AM News Developed by Kalavati Technologies