दिलासादायक! औरंगाबादेत कोरोनाचे बदलते चित्र, जिल्ह्यात आज 87 जणांना कोरोनाची लागण

जिल्ह्यात आज 87 जणांना कोरोनाची लागण झाली असून, कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा हा 44 हजारांच्या पार गेला आहे

औरंगाबाद । देशासह राज्यातही कोरोनाचा वेग मंदावला आहे. आज औरंगाबादमध्ये 87 जणांना कोरोनाची लागण झाली असून, एका जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा हा 44 हजार 609 एवढा झाला आहे. सध्या जिल्ह्यातील विविध भागात 525 रुग्णांवर उपचार सुरू असून, उपचारादरम्यान आतापर्यंत सुमारे 1178 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक म्हणजे आतापर्यंत 42 हाजर 906 जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.


मनपा (70)

एन तीन सिडको (1), सूतगिरणी चौक परिसर (1), एन सात सिडको (4), बालाजी नगर (1), औरंगपुरा (1), वेदांत नगर (1), ठाकरे नगर (1), उल्कानगरी (1), पेठे नगर (1), सारा सिटी (1), दर्गा रोड (3), नक्षत्रवाडी (1), पवन नगर (2), नंदनवन कॉलनी (1), समर्थ नगर (1), आकाशवाणी परिसर (1), अलका नगर (1), एन दोन (1), मुकुंदवाडी (1), एन पाच सिडको (1), अमृतसाई सिटी (1), बंजारा कॉलनी (1), न्यू उस्मानपुरा (1), सिल्क मिल कॉलनी (1), पटेल नगर, बीड बायपास (1), अन्य (39)

ग्रामीण (17)

नाथ गल्ली, पैठण (1), सोलेगाव, गंगापूर (1), जय भवानी नगर, वडगाव (1), नागनाथ नगर, वैजापूर (1), अन्य (13)

एका कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत होनाजी नगरातील 60 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.AM News Developed by Kalavati Technologies