Chandrayaan 2 । 'विक्रम'च्या प्रस्तावित सॉफ्ट लँडिंगवर इस्रो प्रमुख म्हणाले, सर्व काही योजनेनुसार चालू आहे

चांद्रयानाच्या लँडिंगची प्रक्रिया अत्यंत जटिल आहे.

बंगळुरू । चांद्रयान-2 चे लँडर 'विक्रम'च्या चंद्रावरील प्रस्तावित सॉफ्ट लँडिंग करण्याच्या काही तास अगोदर शुक्रवारी इस्त्रोचे अध्यक्ष के. शिवन यांनी सांगितले की, बहुप्रतीक्षित लँडिंगचे योजनेनुसार कार्य सुरू आहे. शिवन यांनी शुक्रवारी वृत्तसंस्थेला सांगितले की, “आम्ही (लँडिंगची) आतुरतेने वाट पाहत आहोत. सर्व काही योजनेनुसार चालू आहे."

'विक्रम' शुक्रवारी मध्यरात्रीनंतर 1.30 ते 2.30 यादरम्यान चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करेल. 'विक्रम'मधील रोव्हर 'प्रज्ञान' लँडरमधून शनिवारी पहाटे साडेसहाच्या दरम्यान बाहेर येईल. सॉफ्ट लँडिंगचे थेट प्रक्षेपण हे इस्रोच्या वेबसाइट, यूट्यूब, फेसबुक आणि ट्विटरवरही प्रसारित केले जाईल.

या अभियानाशी संबंधित एका अधिकाऱ्याने आपले नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, "संपूर्ण (चंद्रयान -२) संघात नक्कीच घबराट आहे, कारण ही एक जटिल मोहीम आहे आणि आम्ही हे प्रथमच करत आहोत. सेन्सर्स, संगणक, कमांड सिस्टम... या सर्वांना योग्यरीत्या कार्य करणे आवश्यक आहे, आम्ही यासाठीच अनेक चाचण्या केल्या. ज्यामुळे आम्हाला सर्व काही ठीक होईल याचा आत्मविश्वास मिळालाय." पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ऑनलाइन क्विझ स्पर्धेच्या माध्यमातून इस्रोने देशभरातून निवडलेले विद्यार्थी, मोठ्या संख्येने मीडिया कर्मचारी आणि इस्रो टेलेमेंटरी ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्क (इस्ट्राक) यांनी हा ऐतिहासिक क्षण बंगळुरूतून पाहणार आहेत.AM News Developed by Kalavati Technologies