Budget 2019 : पेट्रोल-डिझेलसह 'या' दरात वाढ, काय झाले स्वस्त ? जाणून घ्या

Budget 2019 : पेट्रोल-डिझेलसह 'या' दरात वाढ, काय झाले स्वस्त ? जाणून घ्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा (एनडीए-2) अर्थसंकल्प आज (शुक्रवार) सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात अनेक तरतूदी करण्यात आल्या. यामध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ होणार आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून आज अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात अनेक तरतूदी करण्यात आल्या. यामध्ये विशेष अतिरिक्त जकात कर आणि रस्ते विकासकरामध्ये वाढ केली जाणार आहे. त्यामुळे आता पेट्रोल-डिझेलच्या दरात एक रुपयांनी वाढ केली जाणार आहे.

दरम्यान, पेट्रोल-डिझेलमध्ये झालेल्या या दरवाढीमुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसणार आहे.

सोन्याचे दर वाढले

दरम्यान, सोन्याच्या दरात देखील वाढ होणार आहे. सोन्यासह इतर मौल्यवान रत्नांवरची कस्टम ड्युटी वाढवण्यात आली आहे. सोन्यावर सरकारनं 12 टक्के कस्टम ड्युटी केली आहे. त्यामुळे सोन्याचा किंमतीमध्ये देखील वाढ झाली आहे.


काय स्वस्त काय महाग?

'हे' महाग होणार :

▪ गुटखा, सिगरेट, तंबाखू या तंबाखूजन्य पदार्थांवर अतिरिक्त आकारण्यात येणार
▪ पेट्रोल डिझेलच्या किंमतीमध्ये प्रती लिटर दोन रुपयांनी वाढ होणार आहे.
▪ सोन्यावरील आयात कर 10 टक्क्यांवरुन 12.50 टक्के करण्यात आल्याने सोने महागणार
▪ पदेशातून येणाऱ्या पुस्तकांवरील कर वाढवल्याने किंमत वाढणार
▪ पिव्हीसी पाईप, गाड्यांचे सुटे भाग, सिंथेटीक रबर, टाइल्स, फ्लोअरिंग (व्हिनएल फ्लोअरिंग)

'हे' स्वस्त होणार :

▪ विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या खरेदीवर विशेष सवलती, यामुळे इलेक्ट्रीक कार स्वस्त होणार
▪ विमा स्वस्त होणार
▪ घरे स्वस्त होणार : भाड्याने घरे घेण्यासंदर्भातील कायद्यामध्ये बदल करणारAM News Developed by Kalavati Technologies