मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून दोघांनी मारल्या उड्या, संरक्षक जाळीवर अडकले

अपंग शाळेच्या अनुदानासाठी या दोघांनीही उड्या मारल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई । मंत्रालयात पुन्हा एकदा आत्महत्येचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे. यावेळी दोन जणांनी मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून उड्या मारून जीव देण्याचा प्रयत्न केला. असे प्रकार होऊ नयेत म्हणून सरकारने शेतकरी धर्मा पाटील यांच्या मृत्यूनंतर मंत्रालयात संरक्षक जाळी बसवलेली आहे. या जाळीवर आज उडी मारणारे दोघेही अडकले.

अपंग शाळेच्या अनुदानासाठी या दोघांनीही उड्या मारल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, दोघांनी अचानक उडी मारल्याने पोलिसांची मोठी तारांबळ उडाली. पोलिसांनी ताबडतोब धाव घेत दोघांनी संरक्षक जाळीवरून उतरवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. यावेळी आंदोलकांकडून सरकारच्याविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.AM News Developed by Kalavati Technologies