Chandrayaan 2 । विक्रम लँडरशी संपर्क तुटला, डेटाची माहिती पडताळूनच निष्कर्ष काढू - इस्रो

इस्रोतील शास्त्रज्ञांकडून चांद्रयानाच्या डेटाचा अभ्यास सुरू...

एएम न्यूज नेटवर्क । चांद्रयान 2 मोहिमेतील अत्यंत महत्त्वाची असलेल्या सॉफ्ट लँडिंगवेळी लँडर विक्रमशी संपर्क तुटल्याचं इस्रोनं जाहीर केलं. लँडर विक्रमशी चंद्राच्या पृष्ठभूमीपासून 2.1 किमी उंचीवर असताना संपर्क तुटला. अजूनही या लँडरशी पुन्हा संपर्क होण्याची शास्त्रज्ञांना आशा आहे. पंतप्रधान नरेंद मोदींनी यानंतर माध्यमांसमोर इस्रोच्या शास्त्रज्ञांचे कौतुक करत त्यांची पाठ थोपटली. यावेळी मोदी म्हणाले की, "आयुष्यात चढ-उतार येत असतात. परंतु शास्त्रज्ञांनी केलेल्या या प्रयत्नाला तोड नाही. आपण यातून चांगलेच घेऊ आणि चांगलेच होईल याची आशा करू." 

विक्रम लँडरशी संपर्क तुटल्यानंतर इस्रोने पत्रकार परिषद घेणार असल्याचे जाहीर केले होते. विक्रम लँडरशी चंद्राच्या पृष्ठभागापासून 2.1 किमीपर्यंत संपर्क होता, परंतु तो नंतर तुटला. लँडरच्या डेटाचा अभ्यास करणे अजून सुरू असून संपूर्ण पडताळणीनंतरच काहीतरी निष्कर्षापर्यंत येण्याचे इस्रोने जाहीर केले. यामुळे नियोजित पत्रकार परिषद रद्द करण्यात आली. 

तत्पूर्वी, इस्रोचे प्रमुख के. शिवन यांनी माध्यमांना सांगितले की, "लँडर विक्रमशी चंद्राच्या पृष्ठभूमीपासून 2.1 किमी उंचीवर असताना संपर्क तुटला. तो पुन्हा प्रस्थापित होण्याची आम्ही वाट पाहिली." चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करून निवडक देशांच्या पंक्तीत जाण्याचं भारताचं स्वप्न अजूनही अधुरं राहिलं आहे. तमाम देशवासीयांसह अवघ्या जगाचं लक्ष भारताच्या या महत्त्वाकांक्षी मोहिमेकडे होते. सॉफ्ट लँडिंग करून इतिहास रचण्याचा भारताचा प्रयत्न होता. असे झाले असते तर चंद्रावर यशस्वी लँडिंग करणारा भारत चौथा देश ठरला असता. चांद्रयान-2 च्या लँडर विक्रमला सॉफ्ट लँडिंगमध्ये अडथळे आले. रात्री 1 वाजून 59 मिनिटांनी  चंद्रावर उतरले. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी पंतप्रधान मोदीदेखील बंगळुरूला पोहोचले होते. 

यापूर्वी केवळ अमेरिका, चीन आणि रशियानेच चंद्र पृष्ठभागावर आपला रोव्हर किंवा लँडर पाठवला होता. परंतु भारताचे मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे भारताची चांद्रयान -२ मोहीम इतर तीन देशांच्या मोहिमांपेक्षा खूप कमी खर्चामध्ये पार पडली.

जगातील कोणत्याही देशाने जे केले नाही ते भारत साध्य करणार आहे. भारताचे चांद्रयान-2 रात्री उशिरा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल. चंद्राच्या या भागावर पोहोचणारा भारत जगातील पहिला देश असेल. भारतीय अवकाश संशोधन संघटनेचे (इस्रो) शास्त्रज्ञ दीर्घ काळापासून या अभियानास यशस्वी करण्यासाठी दिवसरात्र प्रयत्न करत होते आणि आता तो ऐतिहासिक क्षण आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करून देशातील शास्त्रज्ञांना सलाम केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: चांद्रयान-2 चे लँडिंग पाहण्यासाठी बंगळुरूला पोहोचले आहेत. रात्री एक वाजता मोदी इस्रो सेंटरला पोहोचतील. येथे ते 70 मुलांबरोबर लँडिंगचे प्रक्षेपण पाहणार आहेत.

'सॉफ्ट लँडिंग' होण्यापूर्वी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)चे प्रमुख के. शिवन म्हणाले की, आम्ही ज्या ठिकाणी यापूर्वी कोणीही गेले नव्हते अशा ठिकाणी उतरणार आहोत. आम्हाला सॉफ्ट लँडिंगबद्दल आत्मविश्वास आहे. आम्ही रात्रीची वाट पाहत आहोत. चांद्रयान-2चे विक्रम लँडर चंद्र पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करण्यात यशस्वी झाल्यास रशिया, अमेरिका आणि चीननंतर भारत असा पराक्रम करणारा जगातील चौथा देश ठरेल. याशिवाय चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत जगातील पहिला देशही बनेल.

हेही वाचा - 

Chandrayaan 2 : प्रज्ञान रोव्हरचा असा असेल चंद्रावर संचार, ही आहे खासियत

Chandrayaan 2 : आज मध्यरात्रीनंतर लँडिंगच्या वेळी 'हे' 4 तास अत्यंत महत्त्वाचे

Chandrayaan 2 । 'विक्रम'च्या प्रस्तावित सॉफ्ट लँडिंगवर इस्रो प्रमुख म्हणाले, सर्व काही योजनेनुसार चालू आहे

Chandrayaan2: चांद्रभूमीवर लँडिंग कुठे? 'विक्रम' लँडर स्वत: घेणार निर्णय

chandrayaan 2 । हॉलीवूडपटापेक्षाही कमी खर्चात अंतराळ मोहीम राबवण्याचा भारताचा विक्रम

चांद्रयान-2 इस्रोच्या स्पर्धेत विजय मिळवत बारामतीच्या 'या' मुलीने 'ही' ऐतिहासिक संधी मिळवली

चंद्रयान -2 : पंतप्रधान मोदींचे लँडिंग पाहण्याचे आवाहन, 'तर' पंतप्रधान मोदी तुमचा फोटो रिट्विट करणारAM News Developed by Kalavati Technologies