असदुद्दीन ओवैसी म्हणजे दुसरे झाकिर नाईक - बाबुल सुप्रियो

देशात कायदा सुव्यवस्था आहे याचे भान ठेवा

नवी दिल्ली । ऑल इडिया मजलिस-ए-इत्तेहदल मुस्लिमनचे (AIMIM) प्रमुख असदुद्दिन ओवेसी हे झाकिर नाईक सारखे बनण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी  केला आहे. ते जर लोकांना भडकवण्याचा प्रयत्न करत असेल तर देशात कायदेकानून असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

तत्पूर्वी ओवेसी यांनी भाजप सरकार मोठया उदयोगपतींना लाभ देण्यासाठीच काम करत आहे. तसेच देशात फुट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता. ओवेसी यांनी अयोध्या निकालानंतर आपण या निकालाने समाधनी नसून, सर्वोच्च न्यायालय सुध्दा चूक करू शकतात. न्यायालयाने मस्जिद पाडणाऱ्याकडेच राम मंदिर उभारण्यासाठी ट्रस्टची निमिर्ती करूण मंदिर उभारण्याचा निर्णय दिला हे चुकीचे असल्याचे म्हटले होते. याला उत्तर देतांना बाबुल सुप्रियो यांनी तुम्ही झाकीर नाईकसारखे वागत आहात, देशात कायदा कानून आहे याचे भान ठेवा असे म्हAM News Developed by Kalavati Technologies