नांदेड । रिंग फाइट फेडरेशन ऑफ इंडिया आणि तामिळनाडू राज्य रिंग फाइट असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने 6व्या रिंग फाइट चॅम्पियशनशिपचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागासाठी महाराष्ट्र रिंग फाइट असोसिएशनला संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
फेब्रुवारी 2021 मध्ये होणार चॅम्पियनशिप
रिंग फाइट चॅम्पियशन 2021 मध्ये दि. 5 ते 7 फेब्रुवारीदरम्यान नांदेड येथे होणार आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली राहणार आहे. यामध्ये 12 वर्षांखालील, 14 वर्षांखालील, 17 वर्षांखालील, 19 वर्षांखालील आणि 19 वर्षांवरील असे मुलांचे व मुलींचे गट असणार आहेत. इच्छुक स्पर्धकांनी महाराष्ट्र रिंग फाइट असोसिएशनशी संपर्क साधावा, असे आवाहन संघटनेचे सचिव एस. जसवंदरसिंग रामगादिया यांनी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले आहे.