Final Year Exam : अंतिम वर्षाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई लोकलने प्रवास करता येणार

अंतिम वर्षाच्या परीक्षा देण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना लोकलमधुन प्रवासाची मुभा देण्यात आली आहे

मुंबई । न्यायालयाने सुनावलेल्या निर्णायानंतर अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यावर शिक्कामोर्तब झाला. त्याच पार्श्वभुमीवर अंतिम वर्षाच्या परीक्षा देण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून एक महत्त्वाचा निणर्य घेण्यात आला आहे. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेला जाण्यासाठी मुंबई लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. सध्या मुंबईत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी विशेष लोकल सेवा सुरू आहे. त्याच लोकलमधुन विद्यार्थी आपल्या परीक्षेचं हॉल तिकीट दाखवून लोकलमधुन प्रवास करू शकतात.

दरम्यान, राज्यात कोरोना विषाणूचं आगमन झाल्यानंतर लॉकडाऊन जाहिर करण्यात आले होते. तेव्हापासून मुंबईतील रेल्वेसेवा बंद करण्यात आली आहे. मात्र परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांचे प्रवासासाठी हाल होऊ नयेत म्हणून, केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून हा निणर्य घेण्यात आलेला आहे.AM News Developed by Kalavati Technologies