धक्कादायक! इंग्रजी विषयात गुण कमी मिळाल्याने बारावी पास झालेल्या विद्यार्थ्याची आत्महत्या...

बारावीत 80 टक्के गुण मिळूनही केली आत्महत्या

चिखली । चिखली तालुक्यातील कव्हळा येथील एका बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. विनायक संतोष लांडे असे बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. बारावी परीक्षेत 80 टक्के गुण घेऊन पास झाला होता. मात्र त्याला इंग्रजी विषयात 56 मार्क मिळाल्याने त्याची खंत मनात ठेवून सकाळी पाच वाजेच्या सुमारास आपल्या शेतात जाऊन त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. विनायक हा बुलडाणा येथील सहकार विद्या मंदिर येथे वाणिज्य शाखेत शिकत होता. या विद्यार्थ्यांवर आज अंतिम संस्कार करण्यात आले.AM News Developed by Kalavati Technologies