पोस्टात साडेतीन हजार पदांची भरती, दहावी उत्तीर्णांना मोठी संधी

दहावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे.

औरंगाबाद | औरंगाबाद व जालना जिल्ह्यांमधील शाखा डाकपाल, सहायक डाकपाल व ग्रामीण डाकसेवकांच्या रिक्त पदांची ऑनलाइन भरती केली जाणार आहे. देशभरात पोस्टातर्फे जम्बो भरतीप्रक्रिया राबवण्यात येत आहे. यामध्ये महाराष्ट्रात 3650 जागांवर भरती केली जाणार आहे.

दहावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे. या पदावर दहा हजार ते 12 हजार रुपयांपर्यंत पगार डाकपाल आणि सहायक डाकपालांना दिला जाणार आहे. यासोबतच ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे. पोस्टाने पाठवलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तसेच ते ग्राह्य धरले जाणार नाहीत. यामुळे ऑनलाइन अर्ज करणे बंधनकारक असणार आहे.

या संकेत स्थळांना द्या भेट
https://www.indiapost.gov.in
https://appost.in/gdsonline/

शाखा डाकपाल, सहायक डाकपाल व ग्रामीण डाकसेवकांच्या पदासाठी अर्ज सादर करण्यासाठी ओसी, ओबीसी, ईडब्ल्यूएस पुरुष उमेदवारांसाठी शंभर रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. सर्व महिला, सर्व एससी, एसटी व सर्व अपंग उमेदवारांना कोणतेही शुल्क नसणार आहे.. 30 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन पोस्ट विभागातर्फे करण्यात आले आहे.AM News Developed by Kalavati Technologies