इयत्ता दहावी फेरपरीक्षेचा निकाल जाहीर, २२.८६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

एकूण २ लाख २१ हजार ६२९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, यापैकी ५०,६६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

पुणे । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. 17 जुलै ते 30 जुलै 2019 या काळात ही परीक्षा पार पडली होती. निकालानंतर विद्यार्थांना पुनर्मूल्यांकन करता येईल, तसेच विद्यार्थांना पुढील वर्गात शैक्षणिक प्रवेशही घेता येईल. ऑनलाइन निकाल पाहण्यासाठी विद्यार्थांना त्यांचा बैठक क्रमांक आणि आईचे नाव नोंदवावे लागेल. जुलैमध्ये घेण्यात आलेल्या दहावी फेरपरीक्षेत २२.८६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण २ लाख २१ हजार ६२९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, यापैकी ५०,६६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एक किंवा दोन विषयांत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या तब्बल १ लाख १८ हजार १६१ एवढी आहे.

मार्चमधील परीक्षेत उत्तीर्ण होऊ न शकलेल्या किंवा श्रेणी सुधारू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यानंतर मंडळाने शुक्रवारी फेरपरीक्षेचा निकाल जाहीर केला.

या ठिकाणी पाहा इयत्ता दहावी फेरपरीक्षेचा निकाल

1) mahresult.nic.in
2) maharashtraeducation.com
3) hscresult.mkcl.org

या संकेतस्थळांवरांवर निकाल पाहून विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंट आऊटही काढता येईल.AM News Developed by Kalavati Technologies