दहावी-बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, चार महिन्यांनी होणार परिक्षा

यावेळी 4 महिने आधीच परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येत असल्याचेही मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी सांगितले.

मुंबई | महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी-बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यंदा बारावीची परीक्षा 18 फेब्रुवारी 2020 रोजी सुरू होईल. तर 18 मार्च 2020 रोजी संपणार आहे. तर दहावीची परीक्षा 3 मार्च 2020 रोजी सुरू होईल आणि 23 मार्च 2020 रोजी संपणार आहे. 'mahahsscboard.in' या आपल्या अधिकृत वेबसाईटवर दोन्ही परीक्षांचे वेळापत्रक मंडळाकडून उपलब्ध करून देण्यात आले आहे. यावेळी 4 महिने आधीच परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येत असल्याचेही मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी सांगितले.

डॉ. अशोक भोसले यांनी सांगिले की, हे संभाव्य वेळापत्रक आहे. छापील स्वरूपातील अंतिम वेळापत्रक परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनानंतर देण्यात येतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. सोशल मीडियावरून प्रसिद्ध आणि व्हायरल होणारे वेळापत्रक ग्राह्य धरू नका, असे आवाहन डॉ. भोसले यांनी यांच्याकडून करण्यात आले. दरम्यान, फेब्रुवारी-मार्च महिन्यात राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औंरगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा 9 विभागीय मंडळांमार्फत एकाच वेळी बारावी आणि दहावीची लेखी परीक्षा होणार असल्याचेही जाहीर करण्यात आले.

यंदा चार महिन्यांपूर्वीच परिक्षांचे वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. शाळा आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करता यासाठी परिक्षेच्या तारखा चार महिन्यांआधीच जाहीर करण्यात आल्याचे परीक्षा मंडळांनी सांगितले आहे. त्या दृष्टीने फेब्रुवारी-मार्च 2020 च्या लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. शाळा आणि महाविद्यालयांना संपूर्ण वेळापत्रक लवकरच पाठवण्यात येतील असेही मंडळाकडून सांगण्यात आले आहे. वेळापत्रकाबाबत काही सूचना, हरकती असल्यास त्या विभागीय मंडळाकडे किंवा राज्य मंडळाकडे 15 दिवसांच्या आत लेखी स्वरुपात पाठवाव्यात असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.



AM News Developed by Kalavati Technologies