शालेय विद्यार्थ्यांसाठी ISROची अभूतपूर्व स्पर्धा, विजेत्यांना पंतप्रधानांसह चांद्रयान 2ची लँडिंग पाहण्याची संधी

10 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट असा स्पर्धेचा कालावधी, 8वी ते 10वीचे विद्यार्थी होऊ शकतात सहभागी

नवी दिल्ली । शालेय विद्यार्थ्यांमध्ये अवकाश मोहिमांबाबत जनजागृती होण्यासाठी भारतीय अवकाश संशोधन संस्थेने केंद्र सरकारच्या mygov.in च्या सहकार्याने ऑनलाइन प्रश्नमंजूषेचे आयोजने केले आहे. इयत्ता 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा असून 10 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट असा स्पर्धेचा कालावधी आहे. प्रत्येक राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशातून प्रत्येक दोन टॉप स्पर्धक विद्यार्थ्यांची निवड होणार आहे. या सर्व विद्यार्थ्याना बंगळुरूतील इस्रोच्या कार्यालयात पंतप्रधानांसह चांद्रयान-2ची लँडिंग पाहण्याची संधी देण्यात येणार आहे.

असे आहे प्रश्नमंजूषेचे स्वरूप

> इयत्ता 8वी ते इयत्ता 10वीचे विद्यार्थी प्रश्नमंजूषेत सहभागी होऊ शकतात.
> प्रत्येक स्पर्धकाला MyGov या संकेतस्थळावर स्वतंत्र अकाउंट बनवणे गरजेचे आहे.
> प्रश्नमंजूषा एकदा सुरू झाल्यावर मध्येच थांबवता येणार नाही.
> फक्त भारतीय विद्यार्थ्यांनाच यात सहभागी होता येईल.
> स्पर्धेनंतर प्रत्येक स्पर्धकाला प्रमाणपत्र डाउनलोड करण्याची सोय.
> कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त अचूक उत्तरे असे या स्पर्धेचे निकष आहेत.
> 10 मिनिटांत 20 प्रश्नांची अचूक उत्तरे देणारे विद्यार्थी विजेते.
> प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून 2 विजेते.
> विजेत्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांसह चांद्रयान 2ची लँडिंग पाहण्याची संधी.

या संकेतस्थळावर होता येईल सहभागी
https://quiz.mygov.in/quiz/online-space-quiz/AM News Developed by Kalavati Technologies