पोरांनो लागा तयारीला! पोलीस दलात 12,500 जागांसाठी भरती, गृहमंत्र्यांची मोठी घोषणा

महाराष्ट्र पोलीस दलात 12,500 जागांसाठी भरती केली जाणार असून, याबाबत गृहमंत्र्यांनी घोषणा केली आहे

नागपूर । (सलमान शेख) मागील तीन वर्षांपासून खोळंबलेल्या पोलीस भरतीला अखेर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुर्णविराम दिला आहे. महाराष्ट्र पोलीस दलात 12,500 जागा भरणार असल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे. या भरतीतील 5,300 जणांच्या भरती प्रक्रिया सुरू झाली असून, उर्वरित जागा पुढील टप्पात भरल्या जातील. 12,500 पोलीस भरती करूनही गरज भासल्यास आणखी भरती करू असेही देशमुख म्हणाले.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपुर्वीच ठाकरे सरकारकडून 'एसईबीसी'च्या आरक्षणाशिवाय पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र राज्य सरकारच्या या निर्णयाला मराठा संघटनांकडून तीव्र विरोध करण्यात आला होता. त्यामुळे तत्कालीन पोलीस भरती वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. मात्र पुन्हा एकदा गृहमंत्र्याने पोलीस भरतीची घोषणा केल्याने, आता मराठा संघटना कोणती भुमिका घेतात. हे पाहणे औच्युक्याचं ठरणार आहे.AM News Developed by Kalavati Technologies