CBSE दहावीचा निकाल जाहीर, 13 विद्यार्थ्यांनी मिळवले 500 पैकी 499 गुण

सीबीएसई इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. दुपारी सव्वा दोन वाजता सीबीएसई दहावीचा निकाल घोषित करण्यात आला.

नवी दिल्ली । सीबीएसई इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. दुपारी सव्वा दोन वाजता सीबीएसई दहावीचा निकाल घोषित करण्यात आला. विद्यार्थी व विद्यार्थिनी सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइट cbseresults.nic.in तसेच cbse.nic.in यावर आपला निकाल पाहू शकतात.

सीबीएसई 10वीच्या परीक्षेत या वर्षी मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण चांगले राहिले. या वर्षी मुलींचा निकाल 88% आहे, तर मुलांचा निकाल 85% आहे.

मंत्री प्रकाश जावडेकरांनी केले विद्यार्थ्यांचे अभिनंदन

केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री (HRD) प्रकाश जावडेकर यांनी सीबीएसई 10वीच्या परीक्षेत सहभागी केंद्रीय विद्यालय आणि जवाहर नवोदय विद्यालयाच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. विशेष म्हणजे 10वीमध्ये केंद्रीय विद्यालयाचा निकाल 99.47 आणि जवाहर नवोदय विद्यालयाचा निकाल 98.57 टक्के लागला आहे.

CBSE 10वीचा विभागनिहाय निकाल

1. त्रिवेन्द्रम : 99.85 टक्के
2. चेन्नई : 99.00 टक्के
3. अजमेर : 95.89 टक्के
4. पंचकुला : 93.72 टक्के
5. प्रयागराज : 92.55 टक्के
6. भुवनेश्वर : 92.32 टक्के
7. पाटणा : 91.86 टक्के
8. देहारादून : 89.04 टक्के
9. दिल्ली : 80.97 टक्के
10. गुवाहाटी : 74.49 टक्के

कसा चेक कराल आपला निकाल

1) सीबीएसईची अधिकृत वेबसाइट cbse.nic.in किंवा cbseresults.nic.in यावर जा.
2) वेबसाइटवर दिल्या गेलेल्या Result लिंकवर क्लिक करा.
3) आपला रोल नंबर नोंदवून सबमिट करा.
4) तुमचा निकाल स्क्रीनवर दिसू लागेल.AM News Developed by Kalavati Technologies