Twitter वर दिसणार नाहीत राजकीय जाहिराती, 22 नोव्हेंबरपासून लागू होणार निर्णय

हा निर्णय 22 नोव्हेंबरपासून लागू होणार असून जाहिराती बंद करण्यापूर्वी जाहिरातदारांना एक नोटिस पीरियडसुद्धा दिला जाणार आहे.

टेक डेस्क । जगप्रसिद्ध सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म ट्विटरच्या सीईओ जॅक डोरसे यांनी त्यांच्या सर्व प्लॅटफॉर्मवरून राजकीय जाहिरांना जागतिक स्तरावर बंदी घातली आहे. याबाबत डोरसे यांनी ट्विट करत माहिती दिली. राजकीय जाहिराती ट्विटरवर बंद करण्यामागील कारणसुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय. जॅक यांनी लिहिलंय की, अशा जाहिराती इंटरनेटवर अधिराज्य गाजवतात आणि व्यावसायिक जाहिरातदारांसाठी ते अत्यंत प्रभावी असल्याचे सिद्ध होत होते. व्यावसायिक जाहिरातींसाठी हे ठीक म्हटले जाऊ शकते, परंतु राजकारणात हे एक धोकादायक ठरू शकते.

दरम्यान, फेसबुकने यापूर्वीच आम्ही राजकीय जाहिराती दाखवणे बंद करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. 2016 मध्ये अमेरिकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत परकीय हस्तक्षेपाच्या बातम्यांमुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील राजकीय जाहिराती जागतिक स्तरावर चिंता बनत आहेत. ही आव्हाने फक्त राजकीय नव्हेच तर प्रत्येक प्रकारच्या इंटरनेट कम्युनिकेशनला प्रभावित करतात. त्याचसोबत कंपनी या निर्णयासह फायनल पॉलिसी 15 नोव्हेंबरपर्यंत जाहीर करणार आहे. त्यानंतर हा निर्णय 22 नोव्हेंबरपासून लागू होणार असून जाहिराती बंद करण्यापूर्वी जाहिरातदारांना एक नोटिस पीरियडसुद्धा दिला जाणार आहे.AM News Developed by Kalavati Technologies