कोरोनाचा कहर; सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीचे भावही घसरले

कोरोनामुळे साेने - चांदीच्या दरात मोठी घसरण, भाव गडगडले

मुंबई |  कोरोना विषाणूमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या स्पॉट किंमतींवर मोठा दबाव आला आहे. सोन्याची किंमत प्रति तोळा 40 हजार रुपयांच्या खाली आली आहे. त्याचप्रमाणे चांदीच्या भावात सुद्धा मोठी घसरण झाली आहे. गेल्या 10 दिवसात सोन्याच्या किंमतीत 5 हजारांची घसरण झाली आहे. तज्ञांच्या मते सोन्या-चांदीच्या भावात आता चढ-उतार सुरू राहणार आहे. कोरोनाच्या व्हायरसमुळे नागरिकांनी खरेदी विक्रीकडे पाठ फिरवल्यामुळे सराफा बाजार मोठा परिणाम झाला आहे.

भारतीय फ्युचर्स मार्केटमध्ये एप्रिल गोल्ड फ्यूचर 40 हजार प्रति तोळ्याच्या खाली गेले आहे. मंगळवारी सोन्याच्या भावात थोडी तेजी आली होती. मात्र कोरोना विषाणूमुळे कोरोना विषाणूमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या स्पॉट किंमतींवर खूप दबाव आला आहे. सोमवारी, स्पॉट मार्केटमधील सोने नोव्हेंबरच्या पातळीच्या तुलनेत सुमारे 5 टक्क्यांनी घसरून 1,511.30 डॉलर प्रति औंस झाले. सोमवारी सराफा बाजारात सोन्याचे दरात प्रति तोळा दोन हजारांची घसरण झाली आहे. तर चांदीच्या भावात प्रति किलो 6000 रुपयांनी घसरण झाली आहे. चांदीचा दर प्रति किलो 36,640 रुपयांवर आला आहे. सोन्याच्या दरात घसरण होऊन नवीन दर 39 हजार 661 रूपयांवर आला आहे. AM News Developed by Kalavati Technologies