मुसळधार पाऊसासह, दाट धुक्याच्या साक्षित किल्ले रायगडावर डौलाने फडकला तिरंगा

स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर देशाचा 74 वा स्वातंत्र दिन साजरा करण्यात आला.

रायगड | स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर देशाचा 74 वा स्वातंत्र दिन साजरा करण्यात आला. 14 फुट बाय 21 फुट आकाराचा भव्य राष्ट्रध्वज रायगडावर फडकवण्यात येतो. एवढा मोठ्ठा झेंडा फडकवण्याचा मान लाल किल्ल्यानंतर फक्त किल्ले रायगडाला मिळतो. मुसळधार पाऊस, दाट धुके आणि सोसाट्याच्या वाऱ्यावर डौलात फडकणारा तिरंगा झेडा फडकतांना पाहणे हा विलक्षण आणि वेगळा अनुभव आहे. महाडचे नायब तहसिलदार प्रदिप कुडाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले तर यावेळी एक पोलिस अधिकारी, आठ पोलीस कर्मचारी, पुरातत्व आणि महसुल विभागाच्या कर्मचारी यांनी झेंड्याला सलामी दिली.AM News Developed by Kalavati Technologies