कराची स्टॉक एक्स्चेंजमध्ये दहशतवादी हल्ला; चारही दहशतवाद्यांसह पाच नागरिकांचा मृत्यू

दहशतवाद्यांच्या गोळीबारात पाच निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याचीही माहिती आहे.

कराची । कराचीस्थित पाकिस्तान स्टॉक एक्स्चेंजवर दहशतवादी हल्ला झाला. पाकिस्तानी माध्यमांनुसार, सोमवारी चार दहशतवादी पाकिस्तान स्टॉक एक्स्चेंजच्या इमारतीत घुसले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. प्रत्युत्तराच्या कारवाईत हे चारही दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, दहशतवाद्यांच्या गोळीबारात पाच निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याचीही माहिती आहे.

पाक माध्यमांनुसार, हे चारही दहशतवादी ठार झाले आहेत. कराचीचे पोलीस महानिरीक्षक माध्यमांना म्हणाले की, परिस्थिती नियंत्रणात असून सर्व दहशतवादी ठार झाले आहेत. रेंजर्स आणि पोलिस कर्मचारी इमारतीत दाखल झाले असून शोध मोहीम सुरू आहे. पोलिसांनुसार, दहशतवाद्यांनी अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी हल्ला केला.AM News Developed by Kalavati Technologies