ST Bus Service : तब्बल 5 महिन्यांनंतर 'लालपरी' रस्त्यावर; जिल्ह्याअंतर्गत प्रवास सुरू

जिल्ह्याअंतर्गत प्रवास करण्यास राज्य सरकारने हिरवा कंदील दिल्यानंतर आज सकाळपासून एसटी बसेस धावण्यास सुरुवात झाली.

गंगापुर । कोरोनाचा भारतात शिरकाव झाल्यापासून महाराष्ट्राची एसटी सेवा बंद करण्यात आली होती. मात्र मिशन बिगिन अंतर्गत हळूहळू अनलॉक करण्याची तयारी सुरू झाली होती. यामध्ये विशेषत: एसटीला जिल्ह्याअंतर्गत प्रवासाला परवानगी देण्यात आली नव्हती. मात्र आता जिल्ह्याअंतर्गत प्रवास करण्यास राज्य सरकारने हिरवा कंदील दिल्यानंतर आज सकाळपासून एसटी बसेस धावण्यास सुरुवात झाली.

विशेष म्हणजे प्रवासासाठी कोणत्याही ई-पासची गरज लागणार नाही असे सुद्धा सरकारनं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत शासनाच्या निर्णयाचं स्वागत केले आहे. तर कुठे फटाके फोडून लालपरीचे स्वागत करण्यात आले. राज्य परिवहन महामंडळाने आजपासून एसटी बसेस सुरू करणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर, औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापुर आगारच्या बस स्थानकातून पहिली आंतरजिल्हा बस सकाळी पाचला गंगापूर ते यवतमाळ ही बस सोडण्यात आली. तब्बल पाच महिन्यानंतर एसटीची आंतरजिल्हा बस सेवा सुरू झाली आहे.AM News Developed by Kalavati Technologies