श्री रामांच्या भारतात पेट्रोलचे दर 93 रुपये, तर..; सुब्रमण्यम स्वामी यांची केंद्र सरकारवर टीका

भारतात पेट्रोलचे दर 93 रुपये असून नेपाळमध्ये पेट्रोलचे दर 53 रुपये, तर श्रीलंकेत पेट्रोलचे दर 51 रुपये प्रतिलिटर एवढे आहे. त्यावरून खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे

नवी दिल्ली । देशात 01 फेब्रुवारी रोजी यंदाचं अर्थसंकल्प संसदेत सादर करण्यात आलं. या अर्थसंकल्पातून सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल आणि डिझेल दरासंदर्भात मोठी अपेक्षा होती. मात्र सर्वसामान्यांची ती अपेक्षा अर्थसंकल्पातून पुर्ण झालेली नाही. कोरोना संकटात इंधन दरवाढ झाल्याने सर्वसामान्य जनतेचे अक्षरश: कंबरडे मोडले आहेत. सध्या देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर 100 रुपयांच्या जवळपास आले आहे. त्यावर आता भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

देशातील वाढते इंधन दर यावर सुब्रमण्यम स्वामी यांनी, पेट्रोल आणि डिझेलची तुलना श्रीराम, माता सीता आणि रावण यांत्या जन्मस्थळांसोबत केला आहे. श्रीरामांच्या भारतात पेट्रोलचे दर गगनाला भिडले असून, शेजारील देश नेपाल आणी श्रीलंकात पेट्रोलचे दर अत्यंत कमी असल्याचे सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून दिले आहे. सुब्रमण्यम यांनी ट्विट करत सांगितले आहे की,'प्रभु श्री रामांच्या भारतात पेट्रोलचा दर हा 93 रुपये प्रति लिटर आहे. तर सीतेच्या नेपाळमध्ये पेट्रोलचे दर 53 रुपये प्रति लिटर आहे. तर रावणाच्या श्रीलंकेत पेट्रोलचे दर सर्वात कमी असून तिथे 51 रुपये प्रति लिटर पेट्रोल मिळत आहे.' असे ट्विट करत सुब्रमण्यम यांनी केंद्र सरकारल टोला लगावला आहे.AM News Developed by Kalavati Technologies