सीरम संस्थेत घातपात नसून अपघात, शरद पवारांचे ठाम मत

पुण्यातील सीरम इंस्टीट्यूटला आग लागली होती. त्यात 5 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे

कोल्हापूर । पुण्यातील सीरम इंस्टीट्युटमध्ये गुरुवारी लागलेल्या आगेत पाच कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सीरम इंस्टिट्युटच्या आग लागलेल्या प्लांटची पाहणी करणार आहे. त्यासाठी आज मुख्यमंत्री दुपारी 3 वाजता हेलिकॉप्टरव्दारे पुण्याकडे रवाना होणार आहे. सीरमला लागलेल्या आगीवरून संशय व्यक्त केला जात आहे. त्यासंबंधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. घातापाताची अशी कोणतीही शक्यता नसल्याचं पवार म्हणाले. 'आज आपण असे बोलणे योग्य नाही. सीरम संस्था आणि तिथे काम करणाऱ्या सर्व संशोधकांवर आम्हाला विश्वास आहे. ही घटना घातापाताची नसून पुर्णपणे अपघात आहे' असे ठाम मत पवारांनी व्यक्त केले. सीरम ही जगप्रसिद्ध संस्था आहे. सीरम संस्थेला कोरोना या महामारी विरुद्ध लस शोधण्यात यश मिळालं आहे. ज्या ठिकाणी ही घटना घडली त्यापासून 5 किमी अंतरावर हा अपघात झाला आहे. असेही पवार म्हणाले AM News Developed by Kalavati Technologies