7 महिन्यांत RBI ला दुसरा धक्का, डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांचा राजीनामा

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.

मुंबई । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. 7 महिन्यांच्या आत दुसऱ्यांदा आरबीआयच्या एखाद्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच पद सोडले आहे. यापूर्वी आरबीआय गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी डिसेंबरमध्ये खासगी कारणांचा हवाला देत पदाचा राजीनामा दिला होता.

6 महिन्यांआधीच राजीनामा
विशेष म्हणजे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी कार्यकाळ पूर्ण होण्याच्या सहा महिन्यांआधीच पदाचा राजीनामा दिला आहे. मीडिया रिपोर्टसनुसार, विरल आचार्य आता न्‍यूयॉर्क युनिव्हर्सिटीच्या सॅटर्न स्‍कूल ऑफ बिझनेसमध्ये प्राध्यापक म्हणून शिकवणार आहेत. आचार्य यांनी तीन वर्षांसाठी आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून 23 जानेवारी 2017 रोजी जॉइन केले होते.AM News Developed by Kalavati Technologies