PUBG : पब्जीला भारतात लाँच करण्याची परवानगी नाहीच - आयटी मंत्रालय

लहानांपासून तरुणांपर्यंत सर्वांच्या नजरा लागलेल्या इंडियन वर्जन पबजी गेमला माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने भारतात लाँच करण्यासाठी परवानगी दिली नाही, त्यामुळे त्यांच्यामध्ये नाराजी आहे.

 मुंबई | पब्जी या भारतीय बनावटीच्या मोबाईल गेमला माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने भारतात लाँच करण्यासाठी परवानगी दिली नाही, अशी लहानांपासून तरूणांचा मूड घालवणारी माहिती स्वत: माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने दिली. पब्जी मोबाईल गेम भारतात पुन्हा लाँच करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे का?, असा प्रश्न आरटीआयद्वारे विचारण्यात आला होता. त्यावर मंत्रालयाने परवानगी दिली नसल्याचे स्पष्ट केले. पब्जी मोबाइल इंडियाच्या लाँचिंगबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडे दोन आरटीआय दाखल झाल्या होत्या.

मीडियानामा आणि गेम ईस्पोर्ट्स यांनी दाखल केलेल्या आरटीआयद्वारे, सरकारला विचारणा करण्यात आली. त्यावर मंत्रालयाने PUBG/PUBG Mobile India ला लाँचिंगसाठी परवानगी दिली नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात PUBG Mobile India च्या लाँचिंगची घोषणा झाल्यापासून हा गेम बराच चर्चेत आहे. गेमबाबतचे अनेक बातम्या येत आहेत. पण, आता सरकारने आरटीआयमध्ये दिलेले उत्तर गेमच्या चाहत्यांसाठी नक्कीच निराशाजनक आहे.

केंद्र सरकारने सप्टेंबर महिन्यामध्ये देशात PUBG Mobile सहीत ११८ चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली होती. चीनसोबत सीमेवरील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या सुरक्षेच्या कारणास्तव चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली होती. बंदी घातल्यापासून पब्जी कॉर्पोरेशन भारतात या बॅटल रॉयल गेमच्या पुनरागमनासाठी प्रयत्न करत आहे.AM News Developed by Kalavati Technologies