सोने लवकरच होणार 33 हजारी, लग्नसराई आणि डॉलर वधारल्याने दरामध्ये तेजी

रुपयाच्या तुलनेत अमेरिकन डॉलर वधारल्याने व आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचे भाव वाढल्याने सोन्याचे दर कडालले आहेत. आठवडाभरात सोने 800 रुपये प्रति 10 ग्रॅमने वाढले आहे. अक्षय्य तृतीयेनंतर दरांमध्ये वाढ कायम राहिली आहे.

जळगाव | रुपयाच्या तुलनेत अमेरिकन डॉलर वधारल्याने व आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचे भाव वाढल्याने सोन्याचे दर कडालले आहेत. आठवडाभरात सोने 800 रुपये प्रति 10 ग्रॅमने वाढले आहे. अक्षय्य तृतीयेनंतर दरांमध्ये वाढ कायम राहिली आहे. मार्च महिन्यानंतर कमी झालेले दर मे महिन्यात 32 हजार 900 रुपयांवर पोहचले आहे.

दुष्काळ असला तरी लग्नसराई सुरू आहे. अक्षय्य तृतीयेनंतर सोन्याच्या मागणीत वाढ कायम राहिली. त्याचबरोबर चांदी एका आठवड्यापासून पासून प्रतिकिलो 39 हजारांवर स्थिर आहे. गेल्या आठवड्यात 69.62 रुपये मूल्य असलेले डॉलरचे दर 70.35 रुपयांवर पोहचले आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने 100 रुपयांनी कमी होऊन 32 हजार 100 रुपयांवर आले होते. मात्र त्याच्या दुसऱ्या दिवसापासून दररोज भाववाढ होत आहे.

चांदी 5 मेला वाढून 39 हजार रुपये प्रतिकिलोवर पोहोचली. तेव्हापासून चांदीचा भाव कायम आहे. रुपयाच्या तुलनेत अमेरिकन डॉलर वधारण्यासह, आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचे भाव वाढले आहेत. मात्र लग्नसराईमुळे सोन्याच्या दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. ग्राहक वाढलेल्या किंमतीमध्ये सोने खरेदी करत आहेत. यामुळे दुष्काळात तेराव्या महिन्याला सामोरे जावे लागत आहे असे मत सोने खरेदीदार करत आहेतAM News Developed by Kalavati Technologies