1599 रूपयांचा नोकीया 110 भारतात लॉंच, जाणून घ्या काय आहेत वैशिष्ठ्ये

या फीचर फोनची विक्री 18 ऑक्टोबर पासून चालू होईल. कंपनीचा हा फीचर फोन एंटरटेमेंट सेंट्रिक आहे.

नवी दिल्ली ।  एचएमडी ग्लोबलने भारतामध्ये नवीन फीचर फोन लॉन्च केला आहे. अलीकडेच कंपनीची दोन नवीन स्मार्टफोन - नोकिया 7.2 आणि नोकिया 6.2 देखील लॉन्च झाले आहेत. आता नवीन नोकिया 110 फोन आला आहे. या फीचर फोनची विक्री 18 ऑक्टोबर पासून चालू होईल. कंपनीचा हा फीचर फोन एंटरटेमेंट सेंट्रिक आहे.

नोकिया 110 कंपनीच्या बर्लिनमध्ये आयएफए 2019 च्या वेळी लॉन्च केलं होतं. या फोनमध्ये एफएम रेडिओ, एमपी 3 प्लेयर आणि क्लासिक स्नेक गेम देखील आहे. नोकिया 110 ची किंमत 1,599 रुपये आहे आणि हो ओशन ब्लू, ब्लॅक आणि पिंक कलर व्हॅरिएंट्समध्ये लॉन्च झाला आहे.  हा फोन 18 ऑक्टोबर पासून रिटेल स्टोर्स आणि नोकिया मोबाइल वेबसाइट वरून आपण खरेदी करू शकता.

नोकिया 110 स्पेसिफिकेशन्स

नोकिया 110 मध्ये 1.77 इंच क्यूव्हीजीए डिस्प्ले आहे. हा फीचर फोन प्लास्टिक बॉडी आहे. कंपनीने सांगितले की होय एंटरटेन्मेंट सेंट्रिक फीचर फोन आहे. एफ एफएम रेडिओ आणि मेमरी कार्ड सपोर्ट दिला आहे. 32 जीबी पर्यंत एक्स्टर्नल स्टोरेज लागू करू शकता. यामध्ये पॉपुलर स्नेक गेम देखील आहे.  नोकिया 110 मध्ये कॅमेरा देखील आहे. होय क्यूव्हीजीए रियर कॅमेरा आहे आणि एक एलडीडी टॉर्चलाइट आहे. या फोनमध्ये 800 एमएएचची बॅटरी आहे.AM News Developed by Kalavati Technologies