दुबई | उद्योगपती रतन टाटा यांना 'फेडरेशन ऑफ इंडो-इस्त्रायल चेंबर्स ऑफ कॉमर्स' एफआयआयसीसी ने एकता, शांती आणि स्थिरतेसाठी प्रतिष्ठित ग्लोबल व्हिजनरी ऑफ सस्टेनेबल बिझनेस अॅन्ड पीस पुरस्कार देऊन सम्मनित केले आहे.
आभासी पद्धतीने संपन्न झालेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात टाटा म्हणाले की, भारतासाठी इस्त्रायल नेहमीच मोठ्या संधी करिताचे देश ठरले आहे. त्यांच्या रचनात्मकतेच्या मदतीने भारतात निर्णिती क्षेत्रात भरीव कामगिरी केली जाऊ शकते. यामुळे निर्यातीला प्रोत्साहन मिळेल. इस्त्रायलच्या नागरिकांमध्ये काही वैशिष्टये आहेत, असेही टाटा म्हटले. द्विपक्षीय उद्योग संघटनेचे अध्यक्ष गुल कृपलांनी यांनी या वेळी म्हटले की, इस्त्रायलच्या प्रति रतन टाटा यांचे समर्थन खूप आहे.
भारताला प्रतिष्ठ आणि सम्मानासह जागतिक पातळीवर स्थान मिळावे यासाठी त्यांचे महत्तवाचे योगदान आहे. भारत, इस्त्रायल आणि यूएई या तीन व्यापारिक समुदायाकडून एक व्यक्ती म्हणून टाटांच्या सम्मान केला जातो. ते एकता, शांती आणि स्थिरतेचे प्रतीक आहेत.रतन टाटा भारतातील सर्वाधिक सम्मानित आणि नैतिक व्यवसायी आहेत.