नवी दिल्ली | मारुती सुझुकी, फोर्ड, महिंद्रा अॅन्ड महिंद्रा, एमजी मोटर्सनंतर आता होंडादेखील नववर्षात आपल्या वाहनांच्या किमतीत वाढ करणार आहे. होंडा कार्स इंडिया लि.(एचसीआयएल) कडून यासंदर्भात जाहीररित्या भाष्य न करता डिलर्संना किमती वाढवण्यास सांगितले आहे.
वाहन निर्मितीसाठी लागणाऱ्या सुट्या भागांच्या दरात वाढ झाल्याने देशातील अनेक वाहन उत्पादन करणाऱ्या कंपन्यानी नववर्ष एक जानेवारी 2021 पासून गाड्यांच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आता वाहनांच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आता वाहनांच्या दरात वाढ करणाऱ्या कंपन्यांची यादी मोठी होत असून त्यात होंडाची देखील भर पडली आहे, परुंतु इतर कंपन्यांनी जाहीरीत्या वाहनांच्या दरात वाढ करणार असल्याचे म्हटले आहे, परंतु होंडाने केवळ डिलर्संना गाड्यांनाच्या दरात वाढ करण्याचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान, रेनो इंडियाने 1 जानेवारी 2021 पासून आपल्या सर्व वाहनांच्या दरात 28 हजार रुपयांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय जाहिर केला. त्याचबरोबर मारुती-सुझुकी , फोर्ड इंडिया आणि महिंद्रा अॅन्ड महिंद्रा यांनी टक्केवारी देत वाहनांनी दरवाढ जाहीर केली.