भारताचा चीनला पुन्हा दणका, PUBG सहित 118 मोबाइल अॅपवर बंदी

माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हे अॅप राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक होते.

नवी दिल्ली । केंद्र सरकारने पुन्हा मोठा निर्णय घेऊन चीनला जबरदस्त दणका दिला आहे. केंद्राने PUBG सहित 118 मोबाइल अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने कलम 69ए अंतर्गत या मोबाइल अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. बर्‍याच तक्रारी मिळाल्यानंतर बंदी घालण्याचा निर्णय मंत्रालयाने घेतला आहे. जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हे अॅप्स राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक होते.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हे मोबाइल अॅप्स भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता, भारताचे संरक्षण, राज्याची सुरक्षा आणि सार्वजनिक सुव्यवस्थेसाठी धोकादायक होते.

भारत सरकारने यापूर्वी चीनमधील अनेक अ‍ॅप्सवर बंदी घातली होती, त्यामध्ये टिकटॉकचाही समावेश होता. जूनच्या अखेरीस भारताने टिकटॉक, हेलोसह चीनमधील 59 मोबाइल अ‍ॅप्सवर बंदी घातली. नंतर जुलैच्या शेवटी, आणखी 47 चिनी अॅप्सवर बंदी घालण्यात आली होती.AM News Developed by Kalavati Technologies