मोठी बातमी! 'झी' समुहाच्या कार्यालयावर आयकर विभागाची छापेमारी

आज सकाळी आयकर विभागाने मुंबईतील हेड ऑफिसवर छापेमारी केल्याची माहिती मिळत आहे

मुंबई । देशात सर्वात मोठा मानल्या जाणाऱ्या 'झी' समुहाच्या कार्यालयावर आज सकाळी 11 वाजता आयकर विभागाने छापा मारा आहे. सध्या सुरू असलेल्या छापाच्या कारवाईसंदर्भात अद्याप माहिती समोर आलेली नाही.

झी समुहाच्या लोअर परळ येथील कार्यालयावर आज सकाळी 11 वाजता 6 अधिकाऱ्यांच्या टीमने वरळीतील हेड ऑफिसवर छापेमारी केली. आयकर तसेच त्यात केलेली तफावत याआरोपाखाली झी समुहाच्या 15 ठिकाणी आयकर विभाग सर्च ऑपरेशन करत असल्याची माहिती सुत्रांनी आहे.AM News Developed by Kalavati Technologies