बाप्पा पावला..! कोकणकरांसाठी मध्य रेल्वेकडून मोठी घोषणा; गणेशोत्सवासाठी सोडणार 162 विशेष गाड्या

कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी; मध्य रेल्वेने कोकणासाठी 162 विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे

मुंबई । गणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या, चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वे कोकणाकरांसाठी 162 विशेष रेल्वे गाड्या सोडणार आहे. उद्यापासून या गाड्यांसाठी बुकिंग सुरू होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रत्नागिरी, कुडाळ व सावंतवाडीसाठी या गाड्या सुटणार आहेत. या सर्व गाड्या फक्त चाकरमान्यांसाठी राखीव असणार आहे. रेल्वेत प्रवेश करतांना, प्रवासात व अखेरच्या स्थानकांवर अशा सर्व ठिकाणी कोरोनाच्या अनुषंगाने प्रशासनाच्या नियमाचे पालन करावे लागणार आहे. असे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे.

येत्या 22 ऑगस्टपासून गणेशोत्सवास सुरुवात होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या वेगवेगळ्या नियमांमुळे कोकणातील चाकरमान्यांना वेळेवर गावाकडे पोहोचणे आवश्यक आहे. राज्य सरकारने यासाठी तात्काळ व्यवस्था करावी, अशी मागणी गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू होती. याची दखल घेत राज्य सरकारने एसटीच्या बस सोडण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर, विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णयही सरकारने घेतला होता.AM News Developed by Kalavati Technologies