परभणीत सराफा व्यापाऱ्यावर हल्ला; सोन्या-चांदीचे दागिन्यांसह 5 लाखांचा ऐवज लंपास

मोटारसायकलवर आलेल्या अज्ञात चोरट्यांनी धारदार शस्त्रांनी हल्ला करून व्यापार्‍याजवळील सोन्या-चांदीसह रक्कम लंपास केली आहे

परभणी । परभणी तालुक्यातील दुधगाव येथील एका सराफा व्यापार्‍यावर सोमवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी शस्त्रांसह हल्ला करीत जखमी करून सोन्या-चांदीचे दागिने व रोख अशी 4-5 लाखांचा ऐवज लंपास केला. दुधगाव येथील रहिवाशी असलेले दोन सख्खे भाऊ सराफा व्यापारी झरीतील आपला दैनंदिन व्यवहार आटोपून नेहमीप्रमाणे मोटारसायकलवर दुधगावकडे जात होते. त्यावेळी लोअरदुधना सिंचन प्रकल्पाच्या कालव्याजवळ मोटारसायकलवर आलेल्या अज्ञात चोरट्यांनी धारदार शस्त्रांनी हल्ला करून त्यांच्याजवळी सोन्या-चांदीसह रक्कम पळवली. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी व्यापार्‍यास परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात तात्काळ हलवले. त्या दोघांची जखमीची प्रकृती चांगली आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.AM News Developed by Kalavati Technologies