आढावा घेऊन पाच वर्षातील अन्यायकारक गुन्हे मागे घेऊ - एकनाथ शिंदे

सह्याद्री अतिथीगृहामधील राज्याच्या कॅबिनेटची बैठक संपली

मुंबई । आज मंत्रीमंडळ बैठकीत राज्यातील प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. प्रकल्पांची सद्यस्थिती आणि पुढची कारवाई बाबत आढावा घेण्यात आला आहे. अशी माहिती सह्याद्री अतिथीगृहामधील राज्याच्या कॅबिनेटची बैठक संपली यावेळी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी दिली. मराठा आरक्षणा वेळी जे आंदोलन झाले त्यातल्या प्रमुख नेत्यांबरोबर एक बैठक मुख्यमंत्री घेतील.  मराठा मोर्च्याच्या वेळी आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी होत होती त्या बैठकीत यावर आढावा घेण्यात येईल. आढावा घेऊन आम्ही गुन्हे मागे घेऊ अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. 

तब्बल चार तास झालेल्या बैठकीत राज्यात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईबाबतही चर्चा करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मराठा आंदोलनातील कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली होती. एवढेच नाही तर राज्यातील मंत्री नितीन राऊत आणि पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते, आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनीही उद्धव ठाकरे यांना भेटून भीमा-कोरेगाव आंदोलनातील कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. तब्बल चार तास चाललेल्या या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. तसेच विविध प्रकल्पांचाही आढावा यावेळी घेण्यात आला. राज्यात गेल्या पाच वर्षात दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात येईल. गुन्हे मागे घेताना कोण कोणत्या पक्षाचा आहे, हे पाहिलं जाणार नाही, असं सांगतानाच मराठा आंदोलनात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याबाबतही आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. याचबरोबर शेतकऱ्यांचे आंदोलन, नाणारचे आंदोलन, आरेचे आंदोलन याबाबत आढावा घेऊन त्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ. मागच्या सरकारच्या मंत्रीमंडळ बैठकी बाबत माहिती घेण्यात आली, आम्ही कोणतीही विकासकामे थांबिवली नाहीत. अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.AM News Developed by Kalavati Technologies