अभिनेत्री डिंपल कपाडियांना मातृशोक, वयाच्या 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ट्विंकल खन्नाची आजी आणि अभिनेत्री डिंपल कपाडीया यांची आई बेट्टी कपाडिया यांचे निधन झाले.

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री डिंपल कपाडिया यांच्या आई बेट्टी कपाडीया यांचे निधन झाले आहे. शनिवारी मुंबईमधील हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालावली. बेट्टी कपाडीया यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. यामुळे काही दिवसांपूर्वी मुंबईतील हिंदूजा हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र शनिवारी रात्री ट्विंकल खन्नाची आजी आणि अभिनेत्री डिंपल कपाडीया यांची आई बेट्टी कपाडिया यांचे निधन झाले.AM News Developed by Kalavati Technologies