महाविकास आघाडी सरकार हे 'गुंड' सरकार, कंगनाची राज्य सरकारवर घणाघाती टीका

आज मंदिर उघडण्यासाठी भाजपच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले असून, त्यावर विरोधक आरोप-प्रत्यारोप करीत आहे

मुंबई । राज्यातील मंदिर उघडण्यासाठी भाजपच्या वतीने आज राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. त्यावरून राजकीय मंडळीत चांगलेच आरोप-प्रत्योरोप झाले. 'माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.' असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना लागावला. त्यानंतर आता सुशांत आत्महत्यानंतर चर्चेत आलेली अभिनेत्री कंगना रणौतने सुद्धा या प्रकरणात उडी मारली आहे. महाविकास आघाडी सरकार गुंड सरकार आहे. अशी प्रतिक्रिया कंगना केली आहे.

कंगनाने ट्विट सांगितले आहे की, 'गुंड सरकारला राज्यपालांना प्रश्न विचारत आहे. बार, रेस्टारंट उघडले मात्र मंदिरं उघडले नाही. बाबर सेनेपेक्षा सोनिया सेना वाईट आहे' असा ट्विट कंगना केला आहे. त्यामुळे आता शिवसेना आणि कंगना पुन्हा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, आज राज्यभरातील मंदिरांसमोर मंदिराचे द्वार उघडण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. शिर्डीतील साईबाबा मंदिर, मुंबईतील सिद्धीविनायक मंदिर, पुण्यातील तांबडी जोगेश्वरी मंदिर तसेच नागपूरातील साई मंदिरासमोर भाजप अध्यात्मिक आघाडीचं आंदोलन सुरु करण्यात आलं आहे. दरम्यान मंदिरं खुली करण्यासाठी या आधीसुद्धा भाजपच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आला होता. मात्र ठाकरे सरकराने त्याचे फारसे गांभीर्य घेतले नव्हते. त्यानंतर पुन्हा आता आज राज्यभरात भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे.AM News Developed by Kalavati Technologies