'द स्काय इज पिंक'चा ट्रेलर रिलीज, भावुक करते प्रियंका-फरहानची लव्ह स्टोरी

11 ऑक्टोबर रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.

मुंबई | 'द स्टाय इज पिंक'चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. सोनाली बोस यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. यामध्ये प्रियंका चोप्रा जवळपास 3 वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहेत. यामध्ये सिनेमात जायरा वसीम, फरहान अख्तर, रोहित शरफ यांची प्रमुख भूमिका आहे. सिनेमाचे लूक पोस्टर्स यापूर्वीच रिलीज करण्यात आली आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. 11 ऑक्टोबर रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.

ट्रेलरमध्ये रोमान्स, इमोशंस आणि फॅमिली लव्ह दाखवण्यात आले आहे. द स्काय इज पिंक मोटिवेशनल स्पीकर आयशा चौधरीच्या आयुष्यावर आधारित सिनेमा आहे. तिला पल्मनरी फायबरोसिस हा आजार असतो. प्रियंका सिनेमामध्ये अदिती चौधरी आणि फरहान अख्तर निरेन चौधरीच्या भूमिकेत दिसतोय. हे दोघ पतीपत्नी आहेत तर जायरा त्यांच्या मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे.AM News Developed by Kalavati Technologies